दुर्बिणीद्वारे निमोनियाची शस्त्रक्रिया
तीन वर्षाचा निसार हा डाव्या बाजूच्या न्यूमोनियाच्या आजाराने ग्रसित होऊन जळगाव येथे दाखल झाला. न्यूमोनियामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि फुप्फुसाभोवती पस जमा झाला असल्यामुळे औषधाच्या उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याला शस्त्रक्रियेच्या सल्ल्यासाठी व पुढील उपचारासाठी हॅप्पी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे डॉ मिलिंद जोशी यांच्याकडे दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान त्याच्या डाव्या फुप्फुसात हवा कमी जात असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.त्यामुळे त्याच्या सिटी स्कॅनचा सल्ला देण्यात आला.त्यानंतर डॉ जोशी यांनी त्याची प्रायमरी विडिओ असिस्टेड थोरकॉस्कोपिक सर्जरी (डीकॉर्टिकेशन) हि शस्त्रक्रिया बाळासाठी अत्यंत योग्य राहील असा सल्ला पालकांना दिला. ह्या शस्त्रक्रियेमध्ये बरगड्यांमध्ये ५ मिमी एव्हडे लहान छिद्र करून फुप्फुसाभोवती जमा असलेला पस व फुप्फुसाभोवती असलेले आवरण काढून टाकण्यात येते. फुप्फुसाभोवतीचे आवरण न्यूमोनिया याआजारात प्रमाणापेक्षा जास्त मोठे व जाड होऊन फुप्फुसाला गॅस एक्सचेंज करू देत नाही. न्यूमोनियाच्या साधारणतः ७० ते ८० % बाळांमध्ये अशी परिस्थिती येते. यामध्ये हे आवरण शस्त्रक्रिया करून काढण्याशिवाय पर्याय नसतो. हे आवरण तसेच राहू दिल्यास फुप्फुस निकामी होण्याची सुद्धा शक्यता असते. साधारणतः हि शस्त्रक्रिया छातीवर भला मोठा चिरा मारून करावी लागते. त्यामुळे रुग्णाच्या रिकव्हरीस वेळ लागतो. व ती प्रक्रिया वेदनादायक असते. ह्या उलट आजाराच्या सुरवातीच्या ८ ते १० दिवसांमध्ये रुग्णावरती शस्त्रक्रिया केली गेली तर दुर्बिणीद्वारे आणि मोठा चिरा न लावता हि शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करता येते.सूक्ष्म छिद्र असल्यामुळे रुग्ण बरा होण्याची प्रक्रिया चिऱ्याच्या सर्जरीपेक्षा त्वरित व कमी वेदनादायक असते. असे डॉ जोशी यांचे म्हणणे आहे. ह्या शत्रक्रियेसंबंधी संपूर्ण माहिती नातेवाईकांना देऊन, शस्त्रक्रियेसाठी त्यांची संमती घेण्यात आली.शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या बरगडीमध्ये केवळ ५ मिमी एवढे दोन सूक्ष्म छिद्र करून त्याद्वारे फुप्फुसाभोवती जमा असलेला पस व जाड झालेले आवरण काढून टाकण्यात शिशूशल्यचिकित्सक व दुर्बीण सर्जरी विशेषज्ञ डॉ मिलिंद जोशी व त्यांच्या चमूला यश मिळाले. ह्या शस्त्रक्रियेला प्रायमरी विडिओ असिस्टेड थोरकॉस्कोपिक सर्जरी (डीकॉर्टिकेशन) असे म्हणतात. पुण्यामुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अत्यंत खर्चिक असणाऱ्या या शस्त्रक्रियेला माफक दरात हॅप्पी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे यशस्वीरीत्या करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या ७२ तासात छातीतील नळी काढून रुग्णाला सुट्टी करण्यात आली.शास्त्रक्रियेनंतरची रिकव्हरी त्वरित असल्यामुळे रुग्णाचा औषधी व दवाखान्यात दाखल राहण्याचा वेळ दोन्ही वाचतो. मात्र आजाराच्या योग्य वेळीच शास्त्रक्रियातज्ञाचा सल्ला घेतल्यास हि शस्त्रक्रिया यशश्वीरित्या करता येऊ शकते. हॅप्पी किड्स हॉस्पिटल, जळगाव येथे हि शस्त्रक्रिया उपलब्ध असल्यामुळे महानगरांमध्ये न जाता व कमी खर्चात यशस्वीरीत्या झाल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले व हॉस्पिटलमधील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. शस्त्रक्रियेमध्ये डॉ जोशी यांना हॅप्पी किड्स हॉस्पिटलचे संचालक डॉ निखिल राणे व डॉ प्रीती जोशी यांचे सहकार्य लाभले
पोस्टेरीअर यूरेथ्रल व्हॉल्व्हची यशस्वी शस्त्रक्रिया
९ महिन्याचा सिद्धार्थ ( नाव बदललेले) हा जन्मतः लघवीच्या आजाराने त्रस्त होता त्याला लघवीची धार चांगली येत नसे. अनेक ठिकाणी इलाज करून फायदा न झाल्यामुळे तो हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी आला. त्याला तपासतांना शिशुशाल्यचिकित्सक व युरॉलॉजिस्ट डॉ मिलिंद जोशी यांना त्याच्या लघवीच्या थैलीमध्ये (युरिनरी ब्लॅडर ) लघवी तुंबल्याचे लक्षात आले. त्याच्या पुढील तपासणीमध्ये बाळाच्या मूत्रमार्गात जन्मतः पडदा आहे असे लक्षात आले. या पडद्यामुळे बाळाची लघवी तुंबून त्याचा त्याच्या दोन्ही किडनीवर दुष्परिणाम होत होता. ह्या आजराला पोस्टेरीअर यूरेथ्रल व्हॉल्व्ह असे म्हणतात. यामध्ये मूत्रमार्गात पडद्यामुळे किडनी खराब होते. हा आजार असल्यास जन्मानंतर लवकरात लवकर याचा उपचार केल्यास किडनी वाचवली जाऊ शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या आजरामुळे ३०-४०% मुलांमध्ये वयाच्या दुसऱ्या दशकात किडनी प्रत्यारोपणाची सुद्धा गरज पडते. अत्यंत सूक्ष्म दुर्बिणीद्वारे मूत्रमार्गातील हा पडदा काढून टाकणे ही उपचाराची पहिली पद्धत असते. आजाराच्या निदानावेळी या संपूर्ण परिस्तिथीची कल्पना नातेवाईकांना देऊन डॉ जोशी यांनी दुर्बीण शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. शस्त्रक्रियेदरम्यान बाळाला पूर्णतः बेशुद्ध करून दोन मिमी जाडीच्या सूक्ष्म दुर्बिणीद्वारे ह्या पडद्याचा अडथळा काढून टाकण्यात यश मिळाले. आता बाळाच्या लघवीच्या धारेमध्ये सुधारणा झाली असून त्याचे किडनीचे रिपोर्ट्स सुद्धा सामान्य होत आहेत. ह्या आजारामध्ये पडदा काढून टाकल्यानंतर सुद्धा रुग्णास योग्य ते औषधोपचार अनेक वर्षांपर्यंत घेणे आवश्यक असते अन्यतः दोन्ही किडनी निकामी होऊ शकता. ह्या शस्त्रक्रियेला लागणाऱ्या दुर्बिणी या लहान मुलांसाठी विशेषतः बाहेरील देशातून मागविल्या जातात. ही उपकरणे अत्यंत खर्चिक असतात. तसेच फार थोड्या ठिकाणी उपलब्ध असतात. जळगाव सारख्या शहरांमध्ये अश्या सुविधा रुग्णांसाठी हॅप्पी किड्स हॉस्पिटमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे ह्या शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयाला जाण्याचा सल्ला मिळालेला असून सुद्धा नातेवाईकांनी ही शस्त्रक्रिया हॅप्पी किड्स हॉस्पिटल, जळगाव येथे करण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये अतिशय माफक दरात ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. ही शस्त्रक्रिया या आजाराच्या उपचाराची पहिली पायरी आहे व बाळाला यापुढे औषोधोपचाराची आवश्यक्यता आहे असेही डॉ जोशींनी सांगितले. हॉस्पिटल मधील सेवांबद्दल नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. शस्त्रक्रियेमध्ये त्यांना हॉस्पिटल चे संचालक डॉ निखिल राणे व डॉ प्रीती जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले
छिद्र पडलेल्या पित्ताशयाची दुर्बीण शस्त्रक्रिया यशस्वी
११ वर्षाचा अमित ( नाव बदललेले ) हा अत्यंत गंभीर अवस्थेत पाचोरा येथून उपचारासाठी जळगाव येथील हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याला ५ दिवसापासून तीव्र पोटदुखीचा त्रास व उलट्या होत होत्या. पाचोऱ्याला स्थानिक डॉक्टरांकडे मिळालेल्या इलाजाला प्रतिसाद नसल्यामुळे त्याला जळगावला पाठवण्यात आले होते. हॅप्पी किड्स हॉस्पिटल येथे शिशूशल्यचिकीत्सक व दुर्बीण सर्जरी विशेषज्ञ डॉ मिलिंद जोशी यांनी त्याची तपासणी केल्यावर त्याला पेरिटोनायटिस म्हणजे पोटाचे इन्फेक्शन झाल्याचा निष्कर्ष काढला. अमितच्या रक्त तपासण्यामध्येसुद्धा जंतुसंसर्ग झाल्याचे आढळून आले. पेरिटोनायटिस चे कारण शोधण्यासाठी अमितचा सिटी स्कॅन केला असता त्याच्या पित्ताशयामध्ये छिद्र झालेले आढळले त्यामुळे पित्त पोटामध्ये जमून अमितला बिलियरी पेरिटोनायटिस हा अत्यंत गंभीर आजार झाल्याचे कळले. नातेवाईकांना आजाराची कल्पना देऊन डॉ जोशी यांनी त्याची तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून व केवळ ५ मिलीमीटर एवढ्या लहान छिद्राद्वारे हे पित्ताशय काढण्यात डॉ जोशी व त्यांच्या चमूला यश मिळाले. अतिशय अवघड व जोखमीची हि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे यशस्वी पार पडल्यामुळे केवळ ४८ तासात अमित आजारातून पूर्णपणे बरा झाला. अमितच्या पित्ताशयामध्ये २.५ सेंटीमीटर x २.५ सेंटीमीटर एवढे मोठे छिद्र दिसून आले होते त्यामुळे शरीरात निर्माण होणारे पित्त पोटात पसरत होते व त्याला इन्फेक्शन होत होते. त्या संपूर्ण पित्ताचे आवरण त्याच्या आतड्यांवर जमा झाले होते तसेच आतडे सुद्धा पित्ताशयाला चिपकले होते. या आजाराला स्पॉण्टेनियस परफॉरेशन ऑफ गल ब्लॅडर असे म्हणतात. ही स्थिती अत्यंत दुर्मिळ असून पुष्कळदा पित्ताशयातील खड्यांशिवाय सुद्धा आढळते. या आजारामध्ये पित्ताशय काढून टाकावे लागते. इन्फेक्शन व आतडे चिपकल्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची मानली जाते. जळगाव मधील हॅप्पी किड्स हॉस्पिटल मध्ये अश्या प्रकारची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडून आपला मुलगा निरोगी झाल्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले व आनंद व्यक्त केला. आर्थिक स्थिती चांगली नसतांना सुद्धा माफक खर्चात ही जोखमीची शस्त्रक्रिया केल्याबद्दल व हॉस्पिटल मधील सुविधांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शस्त्रक्रियेमध्ये डॉ जोशी यांना हॅप्पी किड्स हॉस्पिटलचे संचालक डॉ निखिल राणे व डॉ प्रीती जोशी यांचे सहकार्य लाभले
लहान बालकाच्या किडनीवरील आजाराची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया
५० दिवस वय असलेल्या व ४.५ किलो वजनाच्या इरफानला ( नाव बदललेले ), जन्मतः डाव्या बाजूच्या किडनीच्या नळीमध्ये अडथळा होता. त्यामुळे त्याच्या किडनीवर एव्हड्या लहान वयात प्रचंड सूज येऊन किडनीची गाठ तयार झाली होती या गाठीमुळे त्याचे आतडे एका बाजूला ढकलले गेले होते. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास तसेच दूध पिण्यास सुद्धा अडचण येत होती. बाळाला उपचारासाठी हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉ मिलिंद जोशी यांनी बाळाची तपासणी करून त्याला पेल्वीयुरेटरीक जंक्शन ऑब्स्टरकशन हा आजार असल्याचे निदान केले. ह्या आजारामध्ये किडनीच्या नळीमध्ये अडथळा निर्माण होऊन लघवी किडनीमध्ये साठून राहते. साठलेल्या लघवीमुळे किडनीवर सूज येणे, इन्फेक्शन होणे अथवा किडनी संपूर्णपणे निकामी होणे अश्या प्रकारचा धोका संभवतो. एव्हढंच नव्हे तर याचा दुसऱ्या बाजूच्या किडनीवरसुद्धा दुष्परिणाम होऊ शकतो. इरफानची डावी किडनीसुद्धा या आजारामुळे केवळ २० टक्के क्षमतेने काम करत होती. बाळाच्या आजाराची नातेवाईकांना संपूर्ण कल्पना देऊन डॉ जोशी यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये इरफानवर दुर्बिणीद्वारे ही अत्यंत कठीण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. ह्या शस्त्रक्रियेमध्ये बाळाच्या पोटावर केवळ ३ मिमी व ५ मिमी एव्हडे सूक्ष्म छिद्र करण्यात आले व त्याद्वारे किडनीतील नळीचा अडथळा आलेला भाग काढून टाकून सामान्य भाग किडनीशी जोडला गेला. या शत्रक्रियेस लॅपरोस्कोपिक अँडरसन हाईन्स डिसमेम्ब्रेड पायलोप्लास्टी असे म्हणतात. भारतातील अत्यंत मोजक्या ठिकाणी दुर्बिणीद्वारे अशी शस्त्रक्रिया करण्याचे तंत्र उपलब्ध आहे. अत्यंत निष्णात दुर्बीण सर्जरी विशेषज्ञाची उपलबध्दता या शस्त्रक्रियेसाठी लागते. प्रचंड खर्चिक असलेली ही शस्त्रक्रिया जळगावातील हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत माफक दरात डॉ जोशी यांनी पार पडली. या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यासाठी डॉ जोशी यांना भारताबाहेर सुद्धा पाचारण करण्यात येते. मंगोलिया, इथिओपिया इथे सुद्धा डॉ जोशी यांनी अश्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण तेथील डॉक्टरांना दिले आहे. खान्देशमध्ये अश्या प्रकारची शस्त्रक्रिया डॉ जोशी यांनी सर्वप्रथम लहान मुलांमध्ये तसेच मोठ्या माणसांमध्ये २०१४ पासून उपलब्ध करून दिली आहे. एव्हड्या कमी वयाच्या व वजनाच्या बालकामध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये अशी शस्त्रक्रिया संपूर्ण खान्देश, विदर्भ किंवा उत्तर महाराष्ट्र या भागात सर्वात प्रथम व फक्त हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याबद्दल नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानून हॅप्पी किड्स हॉस्पिटलमधील सुविधांबाबत आनंद व्यक्त केला. शस्त्रक्रियेमध्ये डॉ जोशी यांना हॅप्पी किड्स हॉस्पिटलचे संचालक डॉ निखिल राणे व डॉ प्रीती जोशी यांचे सहकार्य लाभले
किडनीचा सूज आलेला भाग
पोटातली अंडकोशाची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया
१८ वर्षाच्या विजय ( नाव बदललेले ) जन्मतः डाव्याबाजूचे अंडकोश योग्य ठिकाणी नसल्याच्या आजाराने ग्रस्त होता. हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये डॉ मिलिंद जोशी यांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याचे डाव्याबाजूचे अंडकोश खाली न उतरता पोटामध्येच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपासण्यांद्वारे हे निदान नक्की झाल्यानंतर डॉ जोशी यांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. सामान्यतः अंडकोश योग्य जागी नसणे ही स्थिती जन्माच्यावेळी लक्षात येते. वयाच्या ६ व्या महिन्यापर्यंत असे अंडकोश योग्य जागी आणणे गरजेचे असते. त्यानंतर अंडकोशाची हार्मोन व वीर्य तयार करण्याची क्षमता कमी होत असल्याचे वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. योग्य जागी नसलेल्या अंडकोशामध्ये भविष्यात कॅन्सर होण्याचा धोकासुद्धा इतर व्यक्तींपेक्षा पाच पटीने जास्त असतो. विजयच्या ऑपरेशन दरम्यान डॉ जोशी यांनी दुर्बीण पद्धतीद्वारे हे अंडकोश पोटामधून योग्य जागी आणून ठेवले. ह्या शस्त्रक्रियेला लॅपरोस्कोपिक सिंगल स्टेज स्टीफन फ्लॉवर ओर्चीडपेकसी असे म्हणतात. महानगरांमध्ये ही शस्त्रक्रिया करण्याचा खर्च जास्त असतो. हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया अत्यंत माफक दारात यशस्वीपणे पार पडली. अंडकोश योग्य जागी नसण्याच्या आजारात लॅपरोस्कोपिक पद्धती ही रुग्णांसाठी वरदानच ठरली आहे. या पद्धतीमुळे पोटामध्ये अत्यंत वर असलेल्या अंडकोशाला सुद्धा यशस्वीरीत्या योग्य जागी आणता येऊ शकते. बऱ्याचदा बालपण पूर्ण केलेल्या रुग्णांना असा आजार माहिती झाल्यानंतर अंडकोश काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. विजयच्या अंडकोशाची दुर्बिणीद्वारे तपासणी केल्यानंतर त्याचे अंडकोश वाचवता येऊ शकते असे लक्षात आल्यामुळे ते शस्त्रक्रियेद्वारे खाली आणण्याचा निर्णय घेतला गेला. ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यामुळे नातेवाईकांनी समाधान व्यक्त करून डॉक्टरांचे आभार मानले.
अंडकोशाची नॉर्मल व ऍबनॉर्मल जागा
अत्यंत कमी वजनाच्या बाळाची यशस्वी शस्त्रक्रिया
लग्नाच्या १५ वर्षानंतर गरोदर झालेल्या नजमा (नाव बदलेले ) हिचे केवळ ३६ व्या आठवड्याला जन्म झालेले व वजनाने केवळ १.३ किलो असलेले बाळ पोट फुगल्यामुळे दवाखान्यात दाखल झाले. शिशुरोगशल्यचिकित्सक डॉ मिलिंद जोशी यांनी बाळाची तपासणी केल्यानंतर त्याच्या आतड्यांमध्ये छिद्र होऊन पोटात हवा जमा झाल्याचे निदान केले. यामुळे बाळाच्या शरीरामध्ये जंतुसंक्रमण होऊन बाळाची परिस्थिती नाजूक होती. निदान नक्की करून डॉ जोशी यांनी बाळाच्या नातेवाईकांना ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. बाळाचे वजन अत्यंत कमी असल्यामुळे व त्याच्या रक्तामध्ये जंतू संक्रमण झाल्यामुळे शस्त्रक्रियेच्या संभाव्य धोक्यांची नातेवाईकांना पूर्ण कल्पना देण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान बाळाच्या जठरामध्ये छिद्र झाल्यामुळे त्याला हा त्रास होत असल्याचे दिसले. हे जठरातील छिद्र टाक्यांद्वारे शिवण्यात आले. या आजाराला सपोटनियस गॅस्ट्रिक परफॉरेशन असे म्हणतात. त्यामध्ये जठराला रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे किंवा जंतुसंसर्ग झाल्यामुळे त्याला छिद्र पडते व आजार जीव घेणा रूप घेतो. कमी वजनाच्या व वेळेआधी जन्माला आलेल्या बाळांमध्ये हा आजार होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. शस्त्रक्रिया ना केल्यास बाळ वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असते. बाळ नजमा ची शस्त्रक्रिया एवढे कमी वजन असूनही यशस्वीपणे पार पडली. आता बाळाला दूध देणे शक्य झाल्यामुळे त्याची प्रकृती सुधारली अत्यंत जोखमीची हि शस्त्रक्रिया एवढ्या कमी वजनाच्या बाळामध्ये व्यवस्तीत पार पडल्यामुळे समाधान मिळाल्याचे डॉ जोशी यांनी सांगितले. शस्त्रक्रियेमध्ये त्यांना हॉस्पिटल चे संचालक डॉ निखिल राणे व डॉ प्रीती जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मृत्यूच्या दाढेतून आपले बाळ परत आल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी हॅप्पी किड्स हॉस्पिटलमधील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले व डॉक्टरांचे आभार मानले.
Before and after Operation
किडनीची कठीण शस्त्रक्रिया यशस्वी
दीड वर्षाचा सुयश (नाव बदललेले ),गाव -धुळे, पोटाच्या गाठीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्याच्या पालकांनी त्याला हॅप्पी किड्स हॉस्पिटल मध्ये भरती केलं. हॉस्पिटलमध्ये शिशूशल्यचिकित्सक डॉ मिलिंद जोशी यांनी बाळाला तपासल्यानंतर बाळाच्या पोटात उजव्या बाजूला किडनीची गाठ असल्याचे निदान केले. बाळाच्या पुढील तपासण्यांमध्ये त्याला जन्मतः हॉरशु किडनी असल्याचे व उजव्या किडनीमध्ये जन्मतः लघवीला अडथळा निर्माण होऊन किडनीवर प्रचंड प्रमाणात सूज असल्याचे समजले. ह्या आजारामध्ये दोन्ही किडनी या वेगवेगळ्या न राहता शरीराच्या मध्यभागी एकमेकांशी जोडलेल्या असतात तसेच किडनीतून निर्माण झालेली लघवी बाहेर पडण्यास अडथळा येतो. सुयशला असलेल्या आजाराला पेल्वीयुरेटरीक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन म्हणतात. ह्या आजारामुळे त्याच्या उजव्या किडनीची कार्यशक्ती अत्यंत कमी झालेली होती. त्यामुळे किडनी वाचवण्याच्या दृष्टीने व लघवीचा अडथळा दूर करण्यासाठी डॉ जोशी यांनी सुयशच्या पालकांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. हा आजार अत्यंत दुर्मिळ असून २० ते ३०००० पैकी एखाद्या व्यक्तीत आढळतो. बालकाचे लहान वय व किडनीवरील सूज यांची जोखीम पत्करून सुद्धा सुयशचे हॅप्पी किड्स हॉस्पिटल मध्ये यशस्वी ऑपरेशन करण्यात आले. सुयशवर लॅपरोस्कोपी असिस्टेड अँडरसन हाईन्स पायलोप्लास्टी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ह्या शस्त्रक्रियेमध्ये दुर्बिणीद्वारे किडनीतील जमा असलेली लघवी काढून टाकण्यात आली व त्यानंतर युरेटर म्हणजे लघवीची नळी कापून किडनीस पुन्हा जोडण्यात आली. अश्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केवळ मुंबईसारख्या महानगरात अत्यंत निवडक ठिकाणी उपलब्ध आहे. परंतु त्याचा खर्च तेथे ३ ते ४ लाख रुपये अंदाजे येतो. हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये मात्र अत्यंत माफक दरात ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. खान्देशसारख्या भागात ही शस्त्रक्रिया उपलब्ध केल्यामुळे त्याचा या भागाला फायदा होईल व मोठ्या शहरांकडे त्यासाठी रुग्णांना जाण्याची गरज पडणार नाही असे डॉ जोशी यांनी सांगितले. या अवघड शस्त्रक्रियेमध्ये त्यांना हॅप्पी किड्स हॉस्पिटलचे संचालक डॉ प्रीती जोशी व डॉ निखिल राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आपल्या बाळाच्या आजारासाठी कुठेही मोठ्या शहरात जाण्याची गरज न पडता ऑपरेशन यशस्वी झाल्यामुळे सुयशच्या पालकांनी हॅप्पी किड्स हॉस्पिटलमधील सुविधांबाबत समाधान मानले व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.
Horseshoe kidney
वेरिकोसिलची दुर्बीण शस्त्रक्रिया यशस्वी
१८ वर्षाचा नितीन ( नाव बदललेले ) हा उजवीकडील अंडकोषामध्ये व जांघेमध्ये दुखण्याच्या त्रासापासून मागील दोन - तीन वर्षांपासून विविध उपचार घेत होता. पुणे, मुंबई येथील नामांकित रुग्णालयातून सुद्धा उपचारानंतर त्याला फायदा होत नव्हता. हॅप्पी किड्स हॉस्पिटल मध्ये डॉ मिलिंद जोशी यांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या उजवीकडील अंडकोशाच्या रक्तवाहिन्यांचा आकार वाढलेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ह्यामुळेच नितीन ला वेदना होत होत्या.तपासण्यांमध्ये ह्याची खात्री केल्यानंतर डॉ जोशी यांनी नितीन ला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. ह्या आजाराला वैद्यकीय भाषेत वेरिकोसिल असे म्हणतात. ह्यामध्ये अंडकोशाच्या रक्तवाहिन्या आकाराने मोठ्या होऊन त्यातील दाब वाढतो त्यामुळे अंडकोषात वेदना होतात. तसेच ह्या आजारामुळे विर्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो व वंध्यत्व सुद्द्धा येऊ शकते. हा आजार वयात येणाऱ्या बालकांमध्ये व तरुणांमध्ये आढळतो. शरीराच्या ठेवणीनुसार डाव्याबाजूच्या अंडकोषात हा जास्त प्रमाणात आढळतो. आजाराची संपूर्ण कल्पना दिल्यानंतर त्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला डॉ जोशींनी नितीन ला दिला. सामान्यतः हे ऑपरेशन चिरा लावून केले जाते. हॅप्पी किड्स हॉस्पिटल मध्ये ही शस्त्रक्रिया दुर्बिणेद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. ह्या प्रकारच्या शस्त्रक्रिया मोठ्या शहरांमध्ये निवडक ठिकाणी उपलब्ध असतात व त्यांचा खर्चही लाखांवर असतो. ह्या शस्त्रक्रियेमध्ये केवळ ५ मिमी चे छिद्र पाडून हि शस्त्रक्रिया केली जाते. जळगाव शहरात सुद्धा हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत माफक दरात ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊन रुग्ण वेदनारहीत झाल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांनी हॅप्पी किड्स हॉस्पिटलमधील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. शस्त्रक्रियेमध्ये डॉ जोशी यांना हॅप्पी किड्स हॉस्पिटलचे संचालक डॉ निखिल राणे व डॉ प्रीती जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Varicocele
ड्युओडिनल वेब ची यशस्वी शस्त्रक्रिया हॅप्पी किड्स हॉस्पिटल मध्ये
हर्षाली (नाव बदललेले) वय - दिड महिने, गाव - नंदुरबार, जन्मापासून दूध पाजल्यानंतर वारंवार उलट्या होत असल्यामुळे व त्यामुळे वजन वाढत नसल्याने तिचे पालक विविध रुग्णालयांमध्ये फिरत होते. मुलीचे वजन वाढत नसल्यामुळे तिचे पालक त्रस्त होते. शेवटी पेशंट हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तेथे शिशूशल्यचिकित्सक डॉ मिलिंद जोशी यांनी बालकाची बारकाईने तपासणी केली व तिच्या आतड्यांचा एक्क्स रे करविला, दोन्ही गोष्टीनंतर बाळाच्या लहान आतड्यांमध्ये पडदा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा पडदा जठरातून बाहेर जाणारे अन्न लहान आतड्यामध्ये पोहचू देण्यास अडथळा निर्माण करत होता. त्यामुळे बालकाचे जठर आकाराने अत्यंत मोठे होऊन तिला उलट्यांचा त्रास होत होता. हेच तिचे वजन न वाढण्याचे कारण आहे हे लक्षात आल्यामुळे डॉ जोशी यांनी नातेवाईकांना हा पडदा काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. या आजारामुळे जन्माच्यावेळी २.५ किलो वजन असलेली हर्षाली दिड महिन्याची झाली तरी तेवढ्याच वजनाची होती. शस्त्रक्रिया जोखमीची असल्याचे परंतु अत्यावश्यक असल्याचे नातेवाईकांना लक्षात आणून देण्यात आले. बालकावर पोट उघडून व त्याच्या आतड्यांना उघडून हा पडदा कापण्यात आला व त्यानंतर आतडे पूर्ववत जोडण्यात आले. या आजारास वैद्यकीय भाषेत ड्युओडिनल वेब असे म्हणतात, त्यामुळे जठरातील अन्न आतड्यांमध्ये जाऊ शकत नाही. हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. १०००० पैकी एखाद्या व्यक्तीमध्ये हा आजार आढळतो. यात शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. या बाळाची हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये यशश्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. यामध्ये डॉ मिलिंद जोशी यांना हॅप्पी किड्स हॉस्पिटलचे संचालक डॉ निखिल राणे व डॉ प्रीती जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बाळाच्या रोगाचे अचूक निदान व यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्याबद्दल हॅप्पी किड्स हॉस्पिटलमधील सुविधांबाबत व डॉक्टरांबाबत नातेवाईकांनी आनंद व्यक्त करून आभार प्रकट केले.
Pre-procedure X-ray
Post procedure X-ray
लहान बालकावरील आतड्याच्या दुर्मिळ आजाराची शस्त्रक्रिया हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये यशस्वी
दीड महिन्याचा रोहन (नाव बदललेले) हा बेंबीमधून शी बाहेर येत असलेला आजार घेऊन हॅप्पी किड्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. शिशूशल्यचिकित्सक डॉ मिलिंद जोशी यांनी बाळाची तपासणी केली असता बाळाच्या बेंबीच्या देठातून शी बाहेर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जन्मतः बाळाची बेंबी गळून पडल्यानंतर बेंबीच्या देठातून आतड्याचा भाग बाहेर येऊन त्याला हा त्रास होत होता. या आजाराला वैद्यकीय भाषेत पेटंट व्हायटेलॉइन्टॅस्टिनल डक्ट असे म्हणतात. ह्यामध्ये लहान आतड्यातून शेपटीसारखा भाग बेंबीच्या देठाशी जोडला जातो. शंभरपैकी केवळ दोन रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो. या शेपटामुळे आतड्याला पीळ पडणे, आतड्यामध्ये छिद्र होणे, आतड्याला अडथळा येणे किंवा आतडे काळे पडणे या प्रकारचा धोका होऊ शकतो. तपासाअंती डॉक्टरांनी बाळाच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. ह्यामध्ये पोट उघडून हि लहान आतड्याची शेपटी काढून नॉर्मल आतडे एकमेकांशी जोडण्यात आले. लहान बालकाची अशी शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची असते. शस्त्रक्रियेनंतर बाळ पूर्णपणे तंदरुस्त झाले. ह्या आजाराबद्दल अधिक माहिती देतांना डॉ जोशी यांनी सांगितले कि दुर्मिळ असलेला हा आजार कधी कधी जीवाला धोकादायकसुद्धा होऊ शकतो. कधी कधी बेंबीच्या देठाशी लाल ठिपका असणे, बेंबी प्रमाणापेक्षा मोठी असणे, बेंबीतून पाण्यासारखा स्त्राव येणे असे सुद्धा ह्या आजाराचे लक्षण असू शकते त्यामुळे अशाप्रकारचा त्रास असलेल्या बालकाच्या पालकांनी ताबडतोब शिशूशल्य विषेशद्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. कुठल्याही प्रकारची गुंतागुंत होण्याआधी ह्या आजाराची शस्त्रक्रिया रुग्णासाठी अत्यंत फायद्याची असते. ह्या शस्त्रक्रियेमध्ये डॉ जोशी यांना हॉस्पिटल चे संचालक डॉ प्रीती जोशी व डॉ निखिल राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आपले बाळ शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे ठीक झाल्यामुळे हॅप्पी किड्स हॉस्पिटल मधील सुविधांबाबत नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले व डॉक्टरांचे आभार मानले.
ऑपरेशन पूर्वी
ऑपरेशन नंतर
पाच रुपयांचे नाणे गिळलेल्या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया
तीन वर्षाची तसलिम ( नाव बदललेले ) गाव - रावेर, नाणे गिळून त्रास होत असल्यामुळे सावदा येथून हैप्पी किड्स हॉस्पिटल येथे दाखल झाली. तिला नाणं अन्ननलिकेत फसलेले असल्यामुळे अन्न गिळण्यास त्रास होत होता. शिशूशल्यचिकित्सक डॉ मिलिंद जोशी यांनी बाळाची तपासणी करून ते नाणे काढण्याचा सल्ला दिला. सामान्यतः असे गिळलेले नाणे शक्यतोवर आतड्यामधून बाहेर निघून जाते. परंतु या मुलीच्या अन्ननलिकेत नाणे फसले व त्यामुळे ते काढणे गरजेचे होते. ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केली जाते. लहान बालकांमध्ये ही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची असते व लहान मुलांसाठी विशिष्ट दुर्बीण लागते. डॉ मिलिंद जोशी यांनी हे नाणे यशस्वीरीत्या इसोफॅगोस्कॉपी ही शस्त्रक्रिया करून काढली. हैप्पी किड्स हॉस्पिटल येथे लहान मुलांच्या अश्या प्रकारच्या विशिष्ट दुर्बिणी उपलब्ध असल्यामुळे त्याचा रुग्णांना फायदा होत आहे. शस्त्रक्रियेनंतर मुलीचा त्रास पूर्ण बरा होऊन ती निरोगी झाली. त्यामुळे नातेवाईकांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे. आजकाल आई वडील किंवा पालक लहान मुलांच्या हातात नाणे, खेळणी, मणी या प्रकारच्या गोष्टी देतात व त्या लहान मुलांद्वारे गिळल्या जातात म्हणून अश्या प्रकारच्या सवईपासून पालकांनी दूर राहावे असे डॉ जोशी यांनी आवाहन केले आहे. या शस्त्रक्रियेमध्ये डॉ जोशी यांना हैप्पी किड्स हॉस्पिटल चे संचालक डॉ प्रीती जोशी व डॉ निखिल राणे यांचे मोलाचे सहकार्य लागले.
Coin impacted In Oesophagus
नऊ महीन्याच्या बाळावर शास्त्रक्रियेविना आतड्यांतील गुंतागुंत सोडवली
नऊ महीन्याच्या प्रतीक पाटील (नाव बदललेले) हे बालक चाळीसगाव येथून आतड्यांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी हॅप्पी किड्स हॉस्पिटल, नेरी नाका, जळगाव येथे दाखल झाले होते. रुग्णालयात शिशुरोग शल्यचिकित्सक व दुर्बीण सर्जेरी विशेषज्ञ डॉ मिलिंद जोशी यांनी बाळाची तपासणी करून व सोनोग्राफी नंतर त्याच्या आतड्यांना पीळ पडला असल्याचे निदान केले. बाळाला इंटुससेप्शन (Intussusception) आजार झाला होता. ह्या आजारात लहान आतडे मोठ्या आतड्यामध्ये शिरते व त्यामुळे आतड्यांमध्ये गुंतागुंत होऊन जीवाला धोका असतो. डॉ जोशी यांनी बाळाच्या नातेवाईकांना आजाराची व इलाजाची संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या संमतीने बाळावर उपचार करण्याचे ठरवले. सामान्यतः ह्या आजारात पोट उघडून गुंतागुंत सोडवण्याचा व शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. डॉ जोशींनी ह्या आजारात हि गुंतागुंत सोडवण्यासाठी बाळाच्या गुद्वारामार्गे पाणी सोडून उपचार करण्याचा निर्णय घेतला. ह्या शस्त्रक्रियेला "हैड्रोस्टॅटीक रिडक्शन ऑफ इंटुससेप्शन" असे म्हणतात. ह्यात ऑपेरेशन न करता हि गुंतागुंत सोडवली जाते, त्यामुळे शस्त्रक्रिया टाळली जाऊ शकते. ह्या पद्धतीद्वारे डॉ जोशी यांनी यशस्वी रित्या बाळावर शास्त्रक्रियेविना उपचार केले. ह्यात त्यांना रुग्णालयाचे डायरेक्टर डॉ निखिल राणे, डॉ प्रीती जोशी व सोनोग्राफी तज्ञ डॉ चेतन काकलीया यांनी सहकार्य केले. अश्या प्रकारची उपचार पद्धती जळगाव मध्ये यशस्वीरित्या करून बाळाला ठीक केल्याबद्दल नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले व आनंद व्यक्त केला.